ब्रेकिंग
शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळाव्याचे आयोजन
0
3
2
9
1
6
जालना/प्रतिनिधी,दि.5
आयटीआय उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.9 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी एल अॅन्ड टी प्रा.लि.पनवेल येथील नामांकित कंपनी सहभाग घेणार आहे. आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्षाच्या परिक्षेला पात्र असणारे प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाचे सुतारकाम (कार्पेटरी) बांधकाम (मेसन), इलेक्ट्रिकल, वायरमन, वेल्डर आणि आरेखक स्थापत्य या व्यवसायातील प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार (बीटीआरआय) यांनी केले आहे.
0
3
2
9
1
6