ब्रेकिंग
महारक्तदान शिबिरास जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची उपस्थिती

0
3
2
1
6
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस तथा रायगड जिल्हा काँग्रेस सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्या वाढदिवसा निमित्ताने महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत उपस्थित राहून श्रीरंग बरगे यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्या समवेत फिशरमन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मार्तंड नाखवा,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अखलाक शिलोत्री आदी उपस्थित होते.
0
3
2
1
6
3