pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माझी माती, माझा देश अभियाना अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न  

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि.10 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
माझी माती माझा देश अभियाना अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज अमृत कलशामध्ये जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते माती टाकण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अमृत वाटीका अंतर्गत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जालना शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर, कार्यालय अधिक्षक विजय फुलंब्रीकर, अक्षय गोरंट्याल, महेश शिंदे, रमेश गौक्षक, सतिश जाधव, महावीर ढक्का, विनोद रत्नपारखी, महेश धन्नावत तसेच महिला बचत गटाचे सदस्य, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2