जालना शहरातील गांधी चमन जुना जालना येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अर्धाकृती पुतळा आगामी काळात बसविण्यात येईल अशी घोषणा आ. कैलास गोरंट्याल यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री गोरंट्याल हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र राख, ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, दलीत मित्र बाबुराव मामा सतकर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, धर्मा खिल्लारे आदींची व्यासपिठावर उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री गोरंट्याल म्हणाले की, स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले यांनी रूजविल्यामुळे आज देशामध्ये महिलांनी चौफेर प्रगती केली आहे. सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य देश कधीच विसरू शकणार नाही. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून अभिवादन केले.
याप्रसंगी गणेश वाघमारे, शिवप्रकाश चितळकर, मंगलताई खांडेभराड, बाबासाहेब सोनवणे, नंदकिशोर गरदास, अनिल वाघमारे, शेख ईब्राहिम, सुंदरराव कुधळे, प्रमोद आल्हाट, गणेश चांदोडे, चंदाताई भांगडीया, संगिता पाजगे, अंजली सपकाळ, मथुराबाई सोळुंके, भगवान तोंडूळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.