pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दूध भेसळ रोखण्यासाठी वितरक, दुकान, स्टॉलची तपासणी करण्याचे निर्देश

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 25

राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पूर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णय क्रं. एमएलके 2023/प्र.क्र.62/पदुम-8 मंत्रालय मुंबई दि. 28 जून 2023 अन्वये शासनाने जिल्हास्तरावर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हयाचे अपर जिल्हाधिकारी यांना घोषीत केले आहे. तर अपर पोलिस अधिक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन,  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र  हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, जालना यांना घोषित केलेले आहे.

सदर शासन निर्णयान्वये समितीच्या कार्यकक्षेनुसार दुध भेसळ रोखण्यासाठी दि. 24 जुलै 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत अध्यक्षांनी, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणारे जिल्हयातील सर्व प्रकारचे परवानाधारक वितरक, दुकान, स्टॉल इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे  निर्देश दिले आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे