खऱ्या ईश्वररूपि दिव्यांगाना ,कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून स्वबळावर उभे राहाण्यासाठी साहित्य देऊन दिला आधार

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29
नांदेड जिल्ह्यातील दिव्यांचा ना स्वबळावर जीवन जगत असताना त्यांना अत्यावश्यक जीवन सुलभपणे जगता यावे म्हणून जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रम व सीएसआर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले.
यावेळी प्रथम दिप प्रज्वलन दिव्यांगाच्या हाताने व्हावे म्हणून दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,आदित्य पाटिल यांच्या हस्ते प्रथम व अनेक मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापु दासरी यांनी केले.
प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी आऊलवार यांनी दिव्यांगाना अत्यावश्यक साहित्य मोजमाप तपासणी शिबिर घेऊन ते दिव्यांचा ना मिळत नसल्यामुळे मा. जिल्हाअधिकारी नांदेड, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड विशेष सुचना देऊन वेळेवर वाटप करण्याचे निर्देश दिले होते. म्हणुन दिव्यांग पुनर्वसन केंद्र, समाज कल्याण विभाग जि.प.नांंदेड यांनी दिव्यांगाचे साहित्य तिनं महिन्याच्या आत वाटप करून दिव्यांगाला आधार दिला.
व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार,अधिक्षक वाय. एच. चव्हाण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, अलीम्कोचे कनिष्ठ प्रबंधक कमलेश यादव, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, कमल कोठारी, अंकिता अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवारसह मान्यवरांनी विचार मांडले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना मोटाराईज्ड ट्रायसीकल, कव्हेंश्नल ट्रायसीकल, श्रवणयंत्र, ब्रेल कीट, स्मार्ट मोबाईल फोन, स्मार्ट केन, क्रचेस, व्हिल चेअर, सी.पी. चेअर, चालण्याची काठी, रोलेटर, वॉकर इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापू दासरी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.