अंबड तालुक्यातील खेडगाव व रोहीलागड येथे पाणलोट रथ यात्रा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.6
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या भूसंसाधन विभाग व मृद व जलसंधारण विभाग व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यात सकाळच्या सत्रात खेडगाव व दुपारच्या सत्रात रोहीलागड येथे पाणलोट रथ यात्रा उत्साहात संपन्न झाली.
सकाळी 9 वाजता खेडगाव येथे केंद्र शासनाच्या मोबाईल व्हॅनचे आगमन झाले. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋतुजा देसाई व खेडगावचे सरपंच शंकरराव गोडसे यांनी रथास हिरवी झेंडी दाखवून रथाचे स्वागत केले. त्यानंतर गावातील मुख्य चौकापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये शाळेतील विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. वाघमारे, चिकनगाव सरपंच रामदास खांडेभराड, जलसंधारण अधिकारी उदय माठे, विठ्ठल ढोबळे, सुशील बिरादार, अश्विनी खुणे, वैष्णवी निलपल्ले, संबंधित ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक, मुख्याध्यापक, शिक्षक, वन विभाग, उमेद , जलसंपदा,आत्मा, कृषि या विभागाचे अधिकारी व गावातील युवक, शेतकरी,महिला बचत गट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलतज्ञ राधेशाम राजपूत यांनी पाणलोट संकल्पना या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिलगड पाणलोट समिती सचिव सतीश होलगे, शिवनाथ ठोके, भारत शिरसाठ, प्रियंका चांदवडे, राजेंद्र लोंढे व पाणलोट समिती खेडगाव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा,मधील विजेते व पाणलोट योध्या व धारिणीताई यांना सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकीत सिंग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाणलोट योजनेतून मंजूर असलेल्या सामूहिक शेततळे व फळबाग लागवड कामाचे भूमिपूजन करण्यात आले व योजनेतून पूर्ण झालेल्या सामुहिक शेततळ्याचे लोकार्पण करण्यात आले. श्रमदान व वृक्षारोपण यावेळी खेडगाव येथील शाळा परिसरात व रोहीलागड येथील वन परीक्षेत्रात श्रमदान करून वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान खेडगाव व रोहिलगड येथील उपस्थित ग्रामस्थ यांना मृद व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली. खेडगाव व रोहिलगड येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाणलोट रथ नियोजनानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूरकडे रवाना करण्यात आला.