pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्र शासनाकडून  ‘सिमी’ बेकायदेशीर संघटना घोषित : बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिकरणाकडून ‘सिमी’ ला नोटीस

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.24

केंद्र शासनाने दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी काढलेली  अधिसूचना क्रमांक S.O. 354 (E) नुसार स्टुडंटस इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेला बेकायदेशिर संघटना म्हणुन घोषित केले आहे. बेकायदेशिर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 चे कलम 3 च्या उपकलम (1) व्दारे ही कारवाई  करण्यात आली आहे. याबाबत बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) न्यायाधिककरण समोर सुनावणी  सुरु असुन दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ‘सिमी’ संघटनेला बेकायदेशीर संघटना का घोषित केले जावू नये याबाबत सिमी संघटनेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश  न्यायाधिकरणाने दिले आहेत.

‘सिमी’ संघटनेच्या कार्यालयाला अधिसूचनेची प्रत लावणे, शक्य् असेल तिथे पदाधिका-यांना नोटीस देणे, नोंदणीकृत पोस्ट अथवा स्पिड पोस्ट अथवा कुरियरव्दारे देखील नोटीस पाठविणे. संघटनेचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात लाऊडस्पिकरवर घोषणा करणे, रेडिओ, दुरदर्शनवरघोषणा करणे, प्रसारमाध्यमातून नोटीस प्रसिध्द करण्याची कार्यवाही  करण्याचे न्यायाधिकरणाने आदेशित केले आहे. या अनुषंगाने  न्यायाधिकरणाची पुढील सुनावणी 09 एप्रिल 2024 रोजी कोर्ट रुम नं. 16, दिल्ली हायकोर्ट, शेरखान रोड, नवी दिल्ली  येथे होणार आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे