दिव्यांगाच्या अनेक मागण्यांसाठी 14 ऑगस्ट २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे दिव्यांग शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा विभागीय अध्यक्ष रंगनाथ मुटकुळे चे आवाहन

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.1
दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी महाराष्ट्र उपाध्यक्ष अल्ताफ काजी साहेब व मराठवाडा विभागीय प्रमुख रंगनाथ मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्र्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन चालूच राहणार आहे 2016 च्या कायद्यानुसार दिव्यांगाना न्याय हक्क का मिळत नाही,दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्यरीत्या कारवाई का होत नाही? शासन प्रशासनास निवेदन दिल्यानंतर योग्य ते कार्यवाही तर नाही त्यांचे साधे ऊतर न देणाऱ्या अधिकाऱ्यावर दिव्यांग हक्क व दप्तर दिरंगाई कायद्याने कार्यवाहि का होत नाही? आंद्रा प्रेदेश प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगाना दरमहा सहा हजार रूपये मानधनात वाढ अनेक सवलतीचि अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे शासन प्रशासनास जागे करण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात दिव्यांगानी आपल्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान विजय काका कुलकर्णी, प्रदिप कामठे,अल्ताफ काजी साहेब रंगनाथ मुटकुळे, विजय घोडेकर,संपत लोणकर,सावित्रा नेवल,पुजा मनवर,रामकिसन काकडे,माधव सावळे,आशा लोणे, कविता घोलप, वंदना पावडे, नाना काळे, सतीश लांबाडे, लखन चव्हाण,
इत्यादी ने केले.