अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वंजारवाडीता.नायगाव येथे दि.20 मार्च ते 27 मार्च 2024उत्साहात आयोजन

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.22
नायगाव तालुक्यातील वंजारवाडीज्ञ येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह श्री विठ्ठल रूक्मीणी मंदिर व हनुमान मंदिर वंजारवाडी येथे 20 मार्च ते 27 मार्च.2024 पर्यंत धार्मिक सप्ताहा सोहळ्यात अनेक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते 6 वाजता काकडा आरती भजन, सकाळी 6ते 7 वाजता श्रींची पुजा सकाळि 7ते 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सकाळि 11 ते 12 तुकाराम महाराज गाथा भजन दुपारी 2 ते 3 श्री मल्हारी सप्तशती पारायण,सायं.4 ते 5 प्रवचन
सायंकाळी 6ते 7वाजता हरिपाठ सांय. 9 ,ते 11 हरि किर्तन हरिभजन असे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहात दि. 20 मार्च रोजी श्री ह.भ.प.सौ.सुमनताई मोहनराव वंजारवाडीकर
दि. 21मार्च रोजी हभप शिवव्याख्याते श्री तानाजी महाराज वासरीकर
दि. 22 मार्च रोजी श्री ह.भ.प.गणेश महाराज आळदिकर
,दि.23 मार्च रोजी श्री हभप बाबु महाराज कांकांडीकर
दि. 24 मार्च रोजी श्री ह.भ.प. श्री दता महाराज वळसंगवाडीकर
दि. 25 मार्च रोजी श्री ह.भ.प. मधुसुधन महाराज कापसीकर
दि.26मार्च रोजी श्री.ह.भ.प.गुरूराज महाराज देगलुकर
दि. 27 मार्च रोजी सकाळी ९ ते १२ काल्याचे किर्तन श्री ह.प निवृतीनाथ महाराज ईसादकर यांचे काल्याचे कीर्तनाने काला वाटुन महाप्रसादाने सांगता होनार आहे.
*ज्ञानेश्वरी व्यासपिठ* हभप बंडु महाराज ईसादकर,
*काकडा भजन* राजाराम गादेवार
*गाथा भजन* वैभव महाराज आंळदिकर,
*गायनाचार्य* रमेश पा,जाधव,साईनाथ जाधव,गंगाधर रूईकर ईत्यादी
*मृदंगाचार्य* गणेश महाराज आळदिकर,बालाजी पुय्यड इकळिकर,
अनेक गावांतील भजनी मंडळ गायक भाविक भक्तानी नामघोषेत सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड हरिनाम सप्ताहात समिती वंजारवाडी यांच्या वतीने दिले