pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पळसा येथे कोहळीकर यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपुजन लोकार्पण संपन्न

0 1 7 4 0 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.6

पळसा ता.हदगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयाने आपल्या वित्त आयोगातुन विविध विकास कामे करीत लोकसहभागातून स्मशानभूमीचा कायापालट करीत कामाने पळसा गाव आकर्षण ठरत आहे. नांदेड येथील उद्योगजक तथा पळसा येथील उपसरपंच संजय भाऊ काला यांनी लोकप्रतीनीधीसह संबधित विभागाकडे सतत पाठपुरावा करून गावातील विविध विकास कामास निधी उपलब्ध करीत कामास सुरुवात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर समर्थकानी केलेल्या पाठपुराव्याला कोहळीकर यांनी विकास कामास झुकते माप देत शासन दरबारी आपले वजन खर्च करीत विविध विकास निधीसह खासदार हेमंत पाटील यांच्या स्थानीक विकास निधीतुन काम मंजुर केली आहेत.ग्रामपंचायत व समर्थकानी गावातील विविध विकास कामाचा कोहळीकर यांच्या हस्ते उदघाटन व लोकार्पण सोहळा
मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सरपंच आशाताई प्रभाकर धाडेराव,माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे,शिवसेना तालुका प्रमुख विवेकराव देशमुख युवासेना तालुका प्रमुख अक्षय पवार बामणीकर, माजी सरपंच शिल्पाताई रणजित कांबळे ,उपसरपंच संजय भाऊ काला, तंटामुक्त अध्यक्ष दत्तराव चव्हाण, संजय गांधी निराधार योजना सदस्य गजानन पंजाबराव मस्के, गजानन अनंतवार कवानकर, माजी उपसरपंच डॉ पिराजी पवार,दत्ता नरवाडे, उतम धनगरे ,प्रकाश धनगरे,नरेंद्र नवघरे, अजय हमरे,प्रतापराव मस्के,गोपळभाऊ मिश्रा,शंकरराव कदम, कामाजी निमडगे, विकास कांबळे,अनिल धनगरे,पांडुरंग नवघरे,मारोतराव धनगरे,दिलीप गंगासागर,शंकरराव मस्के,रामराव मस्के सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी गोपाळ समाज बांधव उपस्थित

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे