pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

बारा वर्षांपासून खासदार दिव्यांगाचा राखिव निधी देत नसतील ?तर अशा खासदाराना दिव्यांगानी मतदानातुन त्यांची जागा दाखवा ?दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचे दिव्यांगाना आव्हान

0 1 7 4 7 4

नांदेड/प्रतिनिधी,दि.15

लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगासाठी राखिव असलेल्या खासदार निधी त्यांच्या मतदार संघातील दिव्यांगाना देऊन त्या दिव्यांगाचा विकास करावा असाही संसदेत केलेल्या कायदा तेच लोकप्रतिनिधी कायदा नियम निकष पाळत नसतील तर दिव्यांगासाठि केलेल्या कायदा फक्त कागदावरच ठेवत असतील तर दिव्यांग कायदा 2016चा कायदा कशासाठी ?
निवडणूक आलि कि अनेक उमेदवार मतांची भिक मागताना मी मतदाराचा सेवक आहे.दिनदुबळ्याचा कैवारी म्हणुन मते मागतात सत्तेत गेल्यानंतर दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द,निराधाराची साधी त्यांना आठवण येत नाहि. दिव्यांगाच्या समस्या संसदेत कधी मांडत नाहित.दिव्यांग बांधव हक्कासाठी प्रशासनास जागे करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन,धरने,मोर्चे करताना कधी लोकप्रतिनिधीला दिसत नसल्यामुळे ते दिव्यांगाच्या आंदोलनात समोर येत नाहित.
ते फक्त सत्तेत गेल्यानंतर आपल्या दहा पिढीची कमाई करून वंश पिलावळ आपली सत्तेत कशी गेली पाहिजे म्हणून या पक्षातुन त्या पक्षात आपल्या स्वार्थासाठी उडी मारून सत्तेसाठी लाचार झालेल्या उमेदवारांला दिव्यांगानी त्यांची जागा मतदान रूपाने दाखऊन त्यांना सतेपासुन वंचीत ठेवावे असे आव्हान दिव्यांग,वृध्द, निराधार, शेतमजुर,गायरान पट्टेधार,सवलती पासुन वंचीत असलेल्या मतदारांनी मतदान रूपाने आपली शक्ती दाखवावी असे आव्हान दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे