रासायनिक युक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी.
रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
पेण तालुक्यातील दादर खाडी येथे रासायनिक युक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत.गेले दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले आहेत.पर्यायाने पेण खारपाडा ते उरण गोवठणे पर्यंत याचा दुष्परिणाम मासेमारी करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांना बसला आहे.
सदर घटनेची गंभीर दखल घेऊन कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने नुकसान भरपाई व संबंधित रसायनी पाताळगंगा येथील रासायनिक कंपनी वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले.कोकण किनारा मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील,
सेक्रेटरी दिलीप पाटील,
उपाध्यक्ष जयवंत तांडेल,
कमिटी सदस्य विनोद पाटील,प्रदीप पाटील, हिरामण पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.