pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस मदत केंद्र जागेची पाहणी हदगांव वांरगा रोडवर विभागाकडून पाहणी

0 1 7 4 1 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.30

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नांदेड वारंगा हदगांव या जुन्या व आता होत असलेल्या रोडवर यापूर्वी सह आताही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हे प्रमाण कमी करणे. अपघात ठिकाणी आवश्यक त्या दृष्टिकोणातुन तात्काळ मदत करणे. महामार्गावरील वाहतुक सुरक्षित व सुरळीत ठेवणे. यासाठी आवश्यक असलेले महामार्ग पोलीस ठाणे नांदेड ते हदगांव दरम्यान अर्धापूर येथील वसमत फाटा येथे आहे. वांरगा हदगांव उमरखेड रोडवर महामार्ग पोलीस केंद्र नसल्याने तेथील परिस्थिती लक्षात घेऊन अपघाताचे प्रमाण कमी करणे सह आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासन व गृह विभाग पोलीस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार महामार्ग पोलीस निरीक्षक एस.डी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धापूर वसमत फाटा महामार्ग पोलीसाकडुन हदगांव वारंगा रोडलगत पोलीस अधिकारी कर्मचारीवर्गास निवासस्थान , कार्यालय ईमारत बांधकाम, रुग्णवाहिका, क्रेन , सर्च लाईट ,अपघातातील वाहनासाठी वाहनतळ पोलीस मदत केंद्र उभारण्यासाठी शासकीय असलेली गायरान जागेची पाहणी केली जात आहे. बरडशेवाळा पळसा अंबाळा येथील जागेची पाहणी करून संबंधित अधिका-यांना तातडीने प्रश्न निकाली काढण्याचे आ याविषयी वरिष्ठ कार्यालयाशी माहीती दिली आहे. यावेळी महामार्ग अर्धापूर पोलीस उपनिरीक्षक अदित्य लाकुळे पोलीस उपनिरीक्षक नईम शेख अंमलदार श्रीराम कदम यांनी पाहणी केली. जवळपास पळसा येथील जागा निश्चित होईल किंवा पर्यायी होईल असे सांगुन पोलीस मदत केंद्राचा प्रश्न लवकरच निकाली लागणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी हदगांव माजी नगरसेवक शफी पटेल पळसा सरपंच प्रभाकर धाडेराव, सामाजिक कार्यकर्त उप सवीताताई विनोद निमडगे ,प्रभाकर दहिभाते फेरोज शेख मनाठकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे