pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रामनगर (सा.का.) येथील साईच्छा हॉटेलमधील कुंटनखाना उध्वस्त दोन परप्रांतीय कॉलगर्ल्ससह हॉटेल मालक व ग्राहक पोलिसांच्या ताब्यात…

परतुरचे डीवायएसपी सुरेश बुधवंत व मौजपूरी पोलिसांची संयुक्त कामगिरी...

0 1 1 8 1 4

विरेगाव/गणेश शिंदे दि.26

मंठा रोडवरील रामनगर येथील गावापासून दूर असलेल्या साईच्छा हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात येथील परप्रांतीय मुलींना बोलावून ग्राहकांना वेश्यागमन करण्यासाठी पुरविण्याचा गोरखधंदा गेल्या काही महिन्यांपासून बिनदिक्कतपणे सुरू होता.
आज पोलीस उपअधीक्षक सुरेश बुधवंत, मौजपूरी पोलीस ठाण्याचे सपोनि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी मोठ्या फौजफाट्यासह धाड टाकली.
यावेळी दोन कॉलगर्ल्स, एक ग्राहक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आले.
यावेळी हॉटेलमालक महेंद्र मंचेवर याच्यासह एक ग्राहक, दोन कॉलगर्ल्स, आशा चार जनांना ताब्यात घेतले आहे.
ही हॉटेल यादव नावाच्या व्यक्तीची असून, ती मंचेवार याने भाडेतत्त्वावर घेतलेली आहे.
मौजपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4