pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अपहरण झालेल्या मुलीबद्दल माहिती असल्यास पोलिस विभागास संपर्क साधण्याचे आवाहन

0 1 1 8 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.9

जालना शहरातील सरस्वती मंदिराजवळ राहणारी मुलगी कु.आराधना नितीन खंडागळे वय 9 वर्ष हीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. तरी मुलगी कु.आराधना ही दिसून आल्यास अथवा तिच्याविषयी काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जालना तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.व्ही.अंभोरे यांनी केले आहे.
दि. 31 ऑक्टोबर 20223 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुलगी कु.आराधना नितीन खंडागळे वय 9 वर्ष राहणार सरस्वती मंदिर जवळ, मोर्या नगर, खरपुडी रोड, ता. जि. जालना ही त्यांच्या राहत्या ठिकाणावरून दुकानातून चॉकलेट घेवून येते, असे घरी आई-वडिलांना सांगून निघुन गेली व परत आलेली नाही. त्यावेळी तिचा परिसरातील आजुबाजुला, इतरत्र ठिकाणी नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला असता मिळुन आली नाही तेंव्हा तिचे पालक आई सुप्रिया नितीन खंडगळे वय 32 वर्ष रा. सरस्वती मंदिर जवळ जालना यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशावरुन गुन्हा कलम 363 भादंवीप्रमाणे दाखल केला आहे. आतापर्यंत अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात आला आहे. परंतु ती मिळुन आली नाही.
अपहरण झालेल्या मुलीचे वय 9 वर्ष असून वर्णनामध्ये बांधा पतळी बारिक, रंग सावळा, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे, उंची 4 फुट, भाषा मराठी व हिंदी शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत असून अंगात कपडे क्रिम कलरचा फ्रॉक, चॉकलेटी रंगाची धोती पॅंन्ट, पायात निळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. या मुलीविषयी काही माहिती असल्यास संपर्क पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन तालुका जालना दुरध्वनी क्र. 8459610483, तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र अंभोरे (मो. 8605966634 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4