pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

चिलपिंपरी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा उत्साहात संपन्न

0 3 8 3 5 3

नांदेड/प्रतिनिधी, दि.21

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेद्वारा गेल्या आठ वर्षापासून हभप राम महाराज पांगरेकर यांच्या संकल्पनेतून “घर तिथे ज्ञानेश्वरी!घरोघरी ज्ञानेश्वरी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यानुसार मौजे चिलपिंपरी येथे गेल्या आठ वर्षापासून अनेक साधक या ज्ञानयज्ञात सहभाग घेऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा संपन्न करतात. यानुसार याही वर्षी सर्व साधक मंडळी व समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून अतिशय सुंदर पद्धतीने सांगता सोहळा संपन्न झाला. यामध्ये सर्वप्रथम वारकऱ्यांच्या सुंदर वेशभूषेमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व साधकाकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील शेवटच्या ५१ ओव्या पारायण करण्यात आल्या. तदनंतर उपस्थित साधकांनी पारायण करत असताना आलेले अनुभव व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित सर्व आम्ही वारकरी परिवारातील पदाधिकारी मंडळींनी ज्ञानेश्वरी पारायणाचे महत्त्व व्यक्त केले. या सांगता सोहळ्यासाठी चिलपिंपरी गावातील सर्व साधक व आम्ही वारकरी परिवारातील संस्थेचे सचिव व्यंकटराव महाराज माळकौठेकर, सहसचिव प्रभाकर महाराज पुय्यड, राज्य सदस्य प्रवीण महाराज पार्डीकर,हरिनाम पा.कदम बाबू महाराज कुदळेकर, नांदेड जिल्हा संघटक बाबुराव पा. जाधव चिंचोलीकर, नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पा. गिरे, किनवट तालुका अध्यक्ष विवेकानंद पा. कसरे, मुखेड तालुकाध्यक्ष मारुती पा.वडजे
मुदखेड तालुका सचिव बालाजी पा. पवार पार्डीकर, प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा. डाकोरे,वैभव महाराज किकीकर, अक्षय महाराज किकीकर, श्याम पा.गाढे, धोंडीबा पा.गाढे, धनंजय महाराज जाधव, साहेबराव पा.जाधव, साईनाथ इरपे, संतोष पा. कवळे, मारुती पा.कवळे तसेच चिलपिंपरी येथील या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे दशरथ पा. गोपीनाथ पा. विलास पा. पुंडलिक पा. नंदाताई गाढे वंदनाताई गाढे व इतर सर्व सदभक्त व गावकरी मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे