उरण ते कन्नूर केरळ येथे प्रवास करताना कारने घेतली अचानक पेट.
उरण मधील कुट्टी परिवारातील सदस्य बाल बाल बचावले कारमध्ये अचानक आग लागताच सर्वांनी कार बाहेर मारल्या उड्या.

उरण?विठ्ठल ममताबादे,दि.28
उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहेमद कुट्टी, रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी ), नोफ एकबाल कुट्टी (मुलगी ), अजीझा इकबाल कुट्टी (मुलगी ), उमर इकबाल कुट्टी (मुलगा )हे सर्वजण एका कुटुंबातील सदस्य २१ मे रोजी रात्री प्रवास सुरु केला.त्यांनी रत्नागिरी गोवा मंगलोर असे फिरता प्रवास केला होता.शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी मारुती एर्टिगा MH 46 CV 6557 या कारने प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी सकाळी ५:३० वाजता कार मधून अचानक धूर येऊ लागला.
केली.रुबीना इकबाल कुट्टी या कार चालवत होत्या.धूर येऊ लागल्याने रुबीना इकबाल कुट्टी यांनी कार अचानक बाजूला पार्किंग केली.
कार मधून अचानक सर्वजण बाहेर पडले. सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत कारला आग लागून कारचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीला आग लागल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सदर घटने बाबत इकबाल अहेमद कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोडे जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने कलम ३०६(१)(C)(FA )अंतर्गत FIR नोंदवून घेतला आहे.सदर वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली ? आग कशी लागली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.