pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखंड म्हाडा कॉलनी नवीन कौठा नांदेड येथे 1 जाने 2024 रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

0 1 7 4 0 8

नांदेड/ चंपतराव ठाकरे पाटिल,दि.31

म्हाडा कॉलनीतील श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोमवारी (दि. १ जानेवारी २०२४) पासुन अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते सहा वाजता काकडी आरती भजन, सकाळी 7ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन,सांय. 6ते 7हरिपाठ, रात्री आठ ते वाजता हरिकीर्तन आणि रात्री अकरा वाजता हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहात एक जानेवारी रोजी श्री ह.भ.प. तुकाराम महाराज पांचाळ चाटोरीकर, दोन जानेवारी रोजी श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वसुरकर (गुरुजी), तीन जानेवारी रोजी श्री ह.भ.प.ब्रम्हानंद महाराज जाहूरकर, चार जानेवारी रोजी श्री ह.भ.प. शैलेश महाराज देशमुख कामठेकर, पाच जानेवारी रोजी श्री ह.भ.प.दत्ता महाराज वळसंगवाडीकर, सहा जानेवारी रोजी श्री ह.भ.प.परमेश्वर महाराज कंधारकर (गुरुजी), सात जानेवारी रोजी श्री ह.भ.प. बापुराव महाराज ठाकूरबुवा सावळेश्वरकर, दि. आठ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज मुडीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
ज्ञानेश्वरी व्यासपिठ श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर
गायनाचार्य विठ्ठलराव शिंदे हिंगोलीकर, ज्ञानेश्वर चव्हाण साखरेकर
मृदंगाचार्य वैभव सादलवाड आळंदीकर

अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज व पिठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज* यांच्या मार्गदर्शना खाली दि. ५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते २नामजप सोहळा होणार आहे.
दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता माऊलीची पालखी मिरवणूक निघणार आहे. सकाळि
9 ते 12 काल्याचे किर्तन होईल त्यानंतर वाजल्यापासुन प्रारंभ होणार आहे. या सर्व कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त म्हाडा कॉलनी, नवीन कौठा, नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.
असे प्रसिध्दीपत्रक श्री विठ्ठल रूक्मीनी मंदिर म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेडच्या वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे