pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन पंधरवाड्यात विविध कुष्ठरोगविषयक आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबवावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

0 1 7 4 1 0

जालना/प्रतिनिधी,दि.24

जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 राबविण्यासाठी दि.26 जानेवारी 2024 रोजी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेण्यात यावी. तर दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात विविध कुष्ठरोगविषयक आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर शेळके , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत दि. 26 जानेवारी, 2024 रोजी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये विशेष ग्राम सभांचे आयोजन करण्यात यावे. तसेच दि. 26 जानेवारी, 2024 रोजी ग्रामसभा आयोजित करुन या ग्रामसभेमध्ये सरपंच, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व कुष्ठ बाधित व्यक्ती यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कुष्ठरोगविषयक संदेश जनसामांन्यांपर्यत पोहचविण्यात यावा. असेही त्यांनी सांगितले.
ग्रामसभेमध्ये जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामप्रमुख, सरपंच यांच्यामार्फत वाचन करण्यात येईल. ग्रामप्रमुख / सरपंचाचे भाषण होईल. कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेणे. गावात बापुंचा पेहराव, सपना या शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोगविषयक माहिती व संदेश देणे. रोगमुक्त कुष्ठरुग्णांस ग्रामसभेस प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित करण्यात येईल. कुष्ठरोगविषयी प्रश्न-उत्तरे, जर कुष्ठबाधित व्यक्ती उपलब्ध असल्यास त्यांचा सत्कार व त्यांच्यामार्फत संदेशाचे वाचन केले जाईल. शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरीचे आयोजन करुन कुष्ठरोगविषयक संदेशाचा फलक प्रदर्शित करण्यात येतील. कलंक कुष्ठरोगाचा मिटवूया, सन्मानाने स्विकार करुया असे यावर्षीचे घोषवाक्य असल्याचे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. सुधाकर शेळके यांनी बैठकीत सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे