प्रतिभा माध्यमिक विद्यालयात आगळावेगळा शिक्षक दिन
विद्यार्थी शिक्षकांनीच केला शिक्षक दिन साजरा

काजळा/प्रतिनिधी, दि.5
बदनापुर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयात आज (दि.5) रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थ्यांमधील मुख्याध्यापक कुमारी कु.जयश्री वाल्हुरे ही होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक विद्यार्थी हजर होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कु.ज्योती जसुद व कु.ज्ञानेश्वरी कोळेकर यांनी स्वागत गीत गाऊन केली. यावेळी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त एक आगळावेगळा शिक्षकांचा गौरव दिन साजरा केला निमित्ताने विद्यार्थ्याने सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व शिक्षक गौरव ट्रॉफी देऊन गौरव केला हा गौरव पाहून शाळेतील सर्व शिक्षक अगदी भारावून गेले होते.
तसेच यावेळी बदनापूर तालुक्यातील मौजे बुटेगाव येथील विद्यार्थ्यांचे पालक यांनीही सर्व शिक्षकांचा पुष्पहार देऊन गौरव केला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीच्या,सावित्रीबाई च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये कु.स्वाती जसूद, कु.दिपाली मदनुरे,कु.स्वाती बोबडे,कु. प्रज्ञा बोबडे,कु. प्रिया सावंत,आदित्य जगदाळे यांनी मनोगते व्यक्त केली.तसेच शाळेतील सहशिक्षक पाटील सर व ऊनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन वर्ग दहावीतील विद्यार्थी कार्तिक राऊत व कुमारी वैष्णवी जाधव या विद्यार्थ्यांनी केले तर आभार नवनाथ पैठणे यांनी मानले.या विद्यार्थ्यांना वर्ग 10 चे वर्गशिक्षक श्री.भगवान धनगे तसेच इंग्रजी विषयाचे शिक्षक लक्ष्मण कुऱ्हाडे यांनी केले.या वेळी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्याने हजर होते.