
जालना/प्रतिनिधी, दि.7
चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी मागील बारा वर्षांपासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही म्हणून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती.
कै.हनुमंत काळे यांनी तळ्यात उडी मारून आत्महत्या केल्यानंतर भाजपा शिक्षक आघाडीचे राज्याध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे यांनी काळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची मदत देण्याबाबत आश्वासित केले होते त्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या पुणे उपसंचालक कार्यालयाने मयत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनिता काळे यांना शिपाई सेवक पदावर अनुकंपा तत्त्वावर भरती करून घेतले तसेच त्यांच्या शालार्थ आयडी ही अत्यंत गतिमान पद्धतीने देण्यात आला तसेच थकीत वेतन 24 लाख 33 हजार 119 इतक्या थकीत वेतनास शासनाने मान्यता दिली या सर्व कामात भाजपा शिक्षक आघाडीचे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार श्रीकांत भारतीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप शिक्षक आघाडीचे राज्य संयोजक डॉ . प्रशांत कोल्हे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संघटक बबनराव उर्किडे या सर्वांचे मराठवाडा विभागाच्या वतीने विभाग संयोजक संजय भातलवंडे,सर्व विभाग सहसंयोजक,जिल्हा संयोजक यांनी सर्वांचे अभिनंदन केले व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.