जवळगाव येथील प्रज्ञा च्या विवाहासाठी रयत प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी
आठ दिवस अगोदर दिली संसार उपयोगी साहित्य

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.18
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतच असतात पण काही ठिकाणचे दुःख हे आपण कल्पनाही करू शकत नाही असे असतात. अश्याच परीस्थितीचा सामना करीत असलेल्या मुळ मुदखेड तालुक्यातील कचरुबाई रमेश पंगीलवाड यांना दोन मुलीच असुन मोठी मुलगी अंपग व नेहमी विविध आजाराने त्रस्त असल्याने शासनाच्या योजनेतून उपचार सुरू आहेत. पतीच्या निधनानंतर आपल्या भावाच्या आश्रयाने जवळगाव ता.हिमायतनगर येथील आबादी येथे कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्यांच्या घरात राहून संसाराचा गाडा चालवतात.परीस्थीतीमुळे तेही किरायाही घेत नाहीत. तर दुसरी मुलगी प्रज्ञा हिचा नुकताच हदगांव तालुक्यातील पाथरड येथील मुलांशी विवाह जुळला.विवाह चोवीस एप्रिल रोजी संपन्न होणार असल्याने दहा दिवस बाकी असुन मुलीच्या विवाहासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थिती आड आल्याची माहिती हदगांव येथील कृष्णा पवार यांनी बरडशेवाळा येथील प्रभाकर दहिभाते यांना दिली.त्यांनी साईप्रसाद परिवाराच्या मेळाव्यात विवाह शक्य नसल्याने हदगांव हिमायतनगर तालुक्यातील गरजु साठी आशेचा किरण ठरलेल्या आशादिप ग्रुप व रयत प्रतिष्ठानला माहिती दिली.
हदगांव येथील विवेकानंद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक तथा शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परीषद हदगांव तालुका अध्यक्ष सटवाजी पवार यांना आपले कर्तव्य पार पाडत समाजासाठी काही तरी देणे लागते या उदात्त हेतुने प्रेरीत होऊन आपल्या मित्र परीवारातील सदस्य यांना सोबत घेऊन शोशल मिडिया च्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण सुरू करीत समाजसेवेसाठी सुरू केलेल्या रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबीयांनी मदत केली असल्याने मिळालेल्या माहितीनुसार सदरील कुटुंबीयाची भेट घेऊन आपल्या प्रतिष्ठानला मदतीचे आवाहन केले होते. रविवार सोळा एप्रिल रोजी रयत प्रतिष्ठानच्या वतीने सर्व संसार उपयोगी साहित्य जवळगाव येथे घरपोच आणुन देत सामाजिक बांधिलकी जोपासली.यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. साहित्य बघण्यासाठी गल्लीतील महिलांनी गर्दी केली होती. रयत प्रतिष्ठानच्या या मदतीचे कौतुक केले जात आहे.
यावेळी रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव चे संस्थापक अध्यक्ष -सटवाजी पवार जवळगावकर, आशादीप चे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र चिल्लोरे, सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे हदगांव, निवृत्ती वानखेडे मानवाडीकर, बंडु माटाळकर निवघाबाजार, प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा, भगवान कदम वाळकीकर, प्रतिष्ठानचे सदस्य संतोष हातवेगळे, सदस्य अमोल पवार , शुभम माने, ओमकार माने, साईनाथ कसेवाड, चंदेल , गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.