pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भरधाव ट्रक-पोलिस वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक गंभीर जखमी:गुरुकुंज मोझरी बायपास वळण मार्गावर अपघात; ट्रक जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा‎ दाखल

0 3 2 4 1 9

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.17

शेंदोळा खुर्द ते गुरुकुंज मोझरी बायपास मार्गाने जाणाऱ्या भरधाव ट्रकने तिवसा पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने पोलिस वाहनावर समोरून येणारी दुचाकी आदळली. या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. हा विचित्र अपघात गुरुकुंज मोझरी परिसरातील एका पेट्रोल पंपानजीक मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाला.प्राप्त माहितीनुसार, गुरुकुंज मोझरीलगत नवनिर्मित बायपास वळण मार्गाने मालवाहू ट्रक क्रमांक सीजी ०७ सीटी ३७२८ हा नागपूरच्या दिशेने भरधाव निघाला. त्याचवेळी गुरुकुंज मोझरी जवळील पेट्रोल पंपासमोर तात्पुरत्या स्वरूपात बनवलेल्या वळण रस्त्याने पोलिस वाहन मुख्य मार्गावर येत होते. त्याचवेळी मागून आलेला भरधाव ट्रक थेट पोलिस वाहनाला धडकला. त्याचवेळी तिवस्याहून मोझरीकडे जाणारी दुचाकी पोलिस वाहनाला धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जितू अळसपुरे वय ३८,रा. भारसवाडी, तिवसा व नामदेव ठाकरे ६२, तिवसा हे गंभीर जखमी झाले होते. दोन्ही जखमींना तातडीने तिवसा रुग्णालयात व नंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दुचाकी चालक जितू अळसपुरेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जखमी नामदेव ठाकरेंवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघातग्रस्त मालवाहू ट्रक जप्त केला. तक्रारीवरून ट्रक चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. बायपास वळण मार्ग हा दिवसेंदिवस अपघाताचे प्रवणस्थळ होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 4 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे