pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित महारॅली उत्साहात संपन्न

शालेय विद्यार्थ्यांनी ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर जी’ जयघोषाने जालना शहर भारावून टाकले

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.21

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील भाविकांना नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी जालना जिल्हा प्रशासानाकडून विविध माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या महासोहळ्यात शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव समाज आदी समाजासह इतर समाजातील सुमारे 9 ते 10 लाख भाविक सहभागी होणार आहेत.

जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागामार्फत आज जालना शहरातील गांधी चमन ते शिवाजी चौक दरम्यान हिंद-दी-चादर’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या महारॅलीत जालना शहर परिसारातील 27 शाळेतील सुमारे 10 हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी या भव्य महारॅलीत सहभागी झाल्या होत्या. श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती असलेले फलक आणि जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाले  होते. ‘हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर जी जयघोषाने जालना शहर दुमदुमन गेला होता.

            या महारॅलीस जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती संगीता भागवत, गटविकास अधिकारी जालना श्री. पवार, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय कांयदे, गिरीश पुजारी, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मनोज कोल्हे, श्रीमती विनया वडजे, रविंद्र काकडे, सुनील ढाकरके, अशोक गायकवाड, सुनील मावकर, अर्जुन पवार, राजे जाधव, श्री. ठाकूर, गुरुद्वारा कमिटीचे सदस्य जगदीश सेठ, गुरद्वारा पुजारी स्वर्णसिंघजी, गुरमीत सिंग सेना, दर्पण सिंग सुखमनी, उद्धव पवार, मुख्याध्यापक विजय उंबरहांडे, श्री देशमुख, श्री. घुगे, श्री. पिसोरे, श्रीमती गट्टपवार, हेनरी डेव्हीड पठाडे, हितेश जोशी आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे