pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कै.प्रशांत पाटील यांच्या शोकसभेत पदा‌धिकारी कार्यकर्ते व विविध मान्यवरांना अश्रू अनावर.

0 3 1 4 2 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, उरणचे सुपुत्र, तरुण तडफदार आक्रमक नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय प्रशांत भाउ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. या दुःखद निधनामुळे सर्वांवरच दुःखाचे डोंगर कोसळले होते. प्रशांत पाटील यांच्यावर प्रेम करणारा पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मित्रवर्ग विविध पक्षाचे नेते हे महाराष्ट्रात सर्वदूर असल्याने सर्वांना एकत्रित करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टीकोणातून गुरुवार दिनांक २७ जून २०२४ रोजी मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप उरण येथे सायंकाळी ४ ते ७ या दरम्यान शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर प्रशांत भाऊ पाटील यांच्या आई हिरावती पाटील, प्रशांत भाऊ यांच्या पत्नी प्रज्ञा पाटील, मुले आदित्य पाटील, अद्वैत पाटील, भाऊ प्रवीण पाटील, राजस पाटील, कपिला पाटील, नूतन भट्टाचार्य उपस्थित होते.या प्रसंगी शिवसेनेचे दिपक भोईर, जगजीवन भोईर, काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते संतोष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरदास गोवारी, ऍड. भार्गव पाटील,उरण नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सीमा घरत, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, शिक्षक नेते नरसु पाटील, जेएनपीटी विश्वस्त रवि पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते.या दरम्यान उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, कॉम्रेड भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, खोपोलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा शैक्षणिक चळवळीतील नेते दत्ताजी मसुरकर,शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश गुडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग रायगड जिल्हाध्यक्ष सदानंद येलवे, उलवे शहर अध्यक्ष संतोष काठे, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभापती काशिनाथ पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कामगार नेते ऍड सुरेश ठाकूर, अखिल भारतीय कराडी समाजाचे अध्यक्ष मदन गोवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या कौतिक भांडारकर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,माजी नगरसेवक जयद मुल्ला, मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, काँग्रेस नेते आर सी घरत, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार तथा शेकाप नेते बाळाराम पाटील या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी तर आभार प्रदर्शन जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी केले. या शोक सभेला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, प्रशांत भाऊ यांचे समर्थक, मित्र परिवार, कुटुंब, नातलग मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी प्रशांत भाऊंच्या आठवणींने सर्वांना अश्रू अनावर झाले. प्रशांत भाऊ गेले नाहीत. प्रशांत भाऊ आमच्या हृदयात आहेत. त्यांचे विचार व कार्य पुढे नेऊ. त्यांचे स्वप्न पूर्ण करू असा संकल्प या निमित्त पदाधिकारी कार्यकर्ते समर्थकांनी यावेळी केला.जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे सुंदर व उत्तम असे आयोजन व नियोजन केले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे