pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरू विद्यालयातील यशवंत विद्यार्थ्यांचा गोलापांगरी परिसरात कौतुकांचा वर्षाव

0 1 1 8 1 9

 गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.1

जालना येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये थ्रो बॉल सारख्या सांघिक खेळामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी “एकलव्याची” भूमिका बजावून तिसरा क्रमांक पटकावून जिल्हाभरात शाळेची मान उंचावून विजयश्री खेचून आणण्यात यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या यशामागे
गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी यांचे शुभा आशीर्वाद, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षक श्रीयुत बी. एस. जाधव सर व श्रीयुत प्राध्यापक सुनील मोरे सर यांचे अपार कष्ट व सर्व सहकारी बंधू-भगिनी व विद्यार्थी यांची इच्छाशक्ती या जोरावर विजयश्री खेचून आणण्यात यश संपादन केले.
तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम व शाळेचे पर्यवेक्षक श्रीयुत आत्माराम मोरे सर यांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुकांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांना पुढील जीवनाच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 9