माता रमाईच्या त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले भारताचे घटनाकार– गणेश आढावे.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.7
आज सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची 108 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. र.तु.देशमुख हे होते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्रकाशन विभागाचे प्रमुख श्री गणेश आढावे यांनी माता रमाईच्या त्यागाची जाणीव करून दिली.ते म्हणाले खऱ्या अर्थाने या देशाचा प्रकांड पंडित,घटनाकार ,ज्ञाणाचा महामेरू डॉ बाबासाहेब आंबेडकर घडण्यासाठी जो त्याग माता रमाईने भोगला आहे त्याची किंमत कधीच मोजता येणार नाही.माता रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना आर्धागीनी होऊन जी साथ दिली त्यामुळेच आज आम्ही सुटा-बुटात दिसत आहोत.ज्या रमाला बालपणातच अनाथ झाली,तीन भावंडांची माय-बाप झाली, नवव्या वर्षातच बांधली बाबासाहेब आंबेडकरशी लग्न गाठ,तिनेच दिली चौदाव्या वर्षी बाबासाहेबांना घट्ट साथ, एकोणतीस वर्ष न डगमगता,न खचता,एका वादळाच्या सहवासात राहीली, तिचे खाण्या पिण्याचे होते हाल, तुटपुंजे कपडे,ना कधी केला समाज नी सृगांर नाही घातले कधी अलंकार,कष्ट वेचले अपार, परिस्थितीमुळे तीनेच गमावले काळजाचे तुकडे,किती भयान होते आमच्या आईचे हाल तरी ती झाली कोटी-कोटीची माय अन् तिच्यामुळेच घडला क्रांतीचा ज्ञानसूर्य डॉ भिमराव अशा शब्दात श्री गणेश आढावे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ.र.तु.देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हणाले माता रमाई ही आजच्या स्त्रीयांनासाठी आदर्श निर्माण करणारी माता आहे त्यांच्या त्यागामुळेच बाबासाहेब आंबेडकर स्त्रीयांना न्याय देऊ शकेल.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.मेढे एस .एल . यांचीही उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ मगरे एम के यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.साळवे एस टी यांनी केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



