pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप, वृक्षारोपण व सत्कार समारोहाचे केले होते आयोजन

0 3 2 1 7 2

जालना/प्रतिनिधी, दि.12

भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस श्री संजीव भांबोरे यांचा वाढदिवस आरोग्य शिबीर, फराळ वाटप, वृक्षारोपण व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा भव्य सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा नुकताच पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी ( चिचाळ ) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अक्षय कहालकर तर प्रमुख अतिथी म्हणून भंडाराचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे, भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभूळकर, विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष सदानंद धारगावे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून कवी मकरंद पाटील जळगाव तर सत्कारमूर्ती म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते.
यावेळी रोशन जांभुळकर, चंद्रशेखर चंद्रशेखर टेंभुर्णे, सत्कारमूर्ती संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन केले. मकरंद पाटील जळगाव यांनी सत्कारमूर्ती पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या जीवनावर कविता सादर केली. प्रबोधनकार भावेश कोटांगले त्याचप्रमाणे तनुजा नागदेवे यांनी संजीव भांबोरे यांच्या जीवनावर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राध्यापक पत्रकार शेखर बोरकर तर आभार पत्रकार विलास केजरकर यांनी मानले.
श्री संजीव भांबोरे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन ९ जून रोजी कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा मार्फत भव्य आरोग्य शिबीर, फराळवाटप व विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्तांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रामुख्याने कवी मकरंद पाटील समाज भूषण जळगाव, चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती सामाजिक सेवा, चवरे प्रबोधनकार तथा कवी, रोशन जांभुळकर सामाजिक क्षेत्र, पत्रकार डी जी रंगारी अंधश्रद्धा निर्मूलन, शितल अतुल नागदेवे कलाक्षेत्र, प्राध्यापक शेखर बोरकर पत्रकारिता सेवा, पंकज वानखेडे सामाजिक क्षेत्र, इंजिनिअर रूपचंद रामटेके सामाजिक क्षेत्र, श्रीकृष्ण देशभ्रतार पत्रकारिता सेवा, कुलदीप गंधे सामाजिक क्षेत्र, पंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा, तुळशीराम गेडाम धम्म चळवळ, अचल मेश्राम फुले शाहू आंबेडकर चळवळ, डॉ अक्षय कहालकर सामाजिक वैद्यकीय सेवा, सदानंद धारगावे सामाजिक कार्य, चंद्रशेखर खोब्रागडे सामाजिक कार्य, आशिष चेडगे पत्रकारिता सेवा, प्रबोधनकार भावेश कोटांगले कला क्षेत्र, डॉ भैयालाल मेश्राम सामाजिक क्षेत्र, पत्रकार विलास केजरकर समाजसेवा, प्राध्यापक प्रेमानंद हटवार पत्रकारिता सेवा, धम्मरक्षित जीवबोधी बौद्ध (मेश्राम) धम्म चळवळ, मीरा भट बेटी बचाव तुमसर, प्राध्यापक प्राची चटप विद्यार्थ्यांना निशुल्क आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण व क्रीडाक्षेत्र महाराष्ट्र कर्णधार, ॲडव्होकेट वसुधा मेगरे गरीब मुलींकरिता निशुल्क इंग्रजी वर्ग, गोविंदा कुरंजेकर पोलीस पाटील सावली सामाजिक सेवा, भाऊराव पंचवटे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड, भाऊ कातोरे पिपरी पुनर्वसन समाजसेवक जिल्हा प्रेमी, भंते विनय बोधि महाथेरो धम्म चळवळ, प्रीतम राजा भोज ९० वेळा रक्तदान करून अनेकांचे जीव वाचविण्याची धडपड, निमाताई रंगारी माता रमाई साहेब पुस्तक भेट, तनुजा नागदेवे कला क्षेत्र सन्मानपत्र व रमाई पुस्तक भेट पुष्पगुच्छ देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेला दवाखाना म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची सेवा करण्यात आली. यात एकूण ५५ रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला “खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा” ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडाराचे डॉ.अक्षय कहालकर, शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, शितल चामट आदींनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे