शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन राजे येरुणकर यांच्या प्रयत्नामुळे उलवे मध्ये प्रकाशाची व्यवस्था.
सचिन राजे येरुणकर यांच्या पाठपुराव्याला यश. उलवे सेक्टर ८ बी मधील नागरिकांनी मानले सचिन राजे येरुणकर यांचे आभार.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22
सेक्टर ८ बी उलवे नोड येथे गेली ७ वर्ष रस्त्यावर दिवे नव्हते.आणि सेक्टर ८ बी हा भाग खूप आतमध्ये असल्यामुळे तिकडे रस्त्यावर अंधार होता आणि नको ते प्रकार घडत होते त्यामुळे रहिवाशी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण होते.या सदर घटनेची व गंभीर समस्येची कल्पना सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव यांनी शेतकरी कामगार पक्षचे युवानेते सचिन राजे येरुणकर यांना दिली. स्वतः सचिन राजे येरुणकर यांनी लोकशाही मार्गाने कायदेशीररित्या शासनाकडे पत्रव्यवहार करून,पाठपुरावा करून फक्त २ आठवड्यामध्ये उलवे ८ बी रस्त्यावर व परिसरात लाईटस लावून दिल्या. नेहमी अंधारात असलेला परिसर सचिन राजे येरुणकर यांच्या प्रयत्नामुळे उजेडात आला. त्या परिसरात अंधाराऐवजी आता लख्ख प्रकाश पडला आहे. आता नागरिकांना प्रवास करणे सुरक्षित व सोप्पे झाले आहे.सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोणातून सचिन राजे येरुणकर यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेक्टर ८ मधील रहिवाशी यांनी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते सचिन राजे येरुणकर यांचे प्रत्यक्ष भेट घेउन आभार मानले.ह्यावेळी सचिन घरत (उप सरपंच ), सुहास देशमुख, राजेंद्र घरत,राकेश घरत, रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, रमेश ठाकूर, अण्णा घरत, मिलिंद ढोके,चंद्रकांत बाकळकर, विठ्ठल जाधव, प्रदीप भंडारे,जितू राणे, प्रशांत थोरात, राकेश बदावटे, मुकेश मोरे, कोकणकर संघटनेचे मुरकर साहेब, जेष्ठ नागरिक, सेक्टर ८ बी येथील रहिवाशी उपस्थित होते.