pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना वृत्तपत्रांनी पालकमंत्र्यांच्या बातम्या प्रकाशित न करण्याचा घेतला निर्णय

0 1 1 8 3 4
जालना/प्रतिनिधी,दि.8
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार (दि 8) रोजी खरीप हंगामाच्या तयारी संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. नियमित प्रमाणे या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार येतात व या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले, काय उपाय योजना ठरल्या याची माहिती घेतात. पण आजच्या या बैठकीसाठी आलेल्या पत्रकारांना वार्तांकनासाठी बैठकीत बसू न दिल्यानं पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध नोंदवला. यावेळी प्रिंट मिडिया आणि ईलेक्ट्रानिक मिडियाचे पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पालकमंत्री अतुल सावे यांच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येऊ नये असे यावेळी सर्व पत्रकारांनी ठरवले असून तसे वृत्तपत्रांना आवाहनही केले आहे.
दरम्यान, पत्रकारांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती दिली.
अतुल सावे हे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जात नाही, नुकसानीचे निर्णय देत नाहीत. आढावा बैठका घेतात पण त्याची माहिती पत्रकांनाना देत नाही, पत्रकार परिषद ही घेत नाही. वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना बैठकीत बसू न दिल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी अतुल सावे यांच्या तक्रारींचा पाढाच जिल्हाधिकारी यांच्या समोर वाचला.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पत्रकारांनी सांगितले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4