राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघच्या माध्यमातून मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक इंडिया प्रा. लि.कंपनीतील कामगारांना मिळाली पगार वाढ

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ च्या वतीने मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक इंडिया प्रा. लि. मु. वेश्वी, ता. उरण या कंपनी मधील रिफर डिव्हिजन कामगारांचा रू ५७००/- वेतनवाढीचा करार संपन्न झाला.राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५/९/२०२४ रोजी RMBKS कार्यालय जासई उरण येथे वेतनवाढ करार संपन्न झाला.या प्रसंगी मे. ई.एफ.सी लॅाजिस्टीक प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत राणे, कमर्शियल हेड शंकर पिल्लाई व कामगार प्रतिनिधी मनोहर नाईक, के. जानकीरामन हे उपस्थित होते. सदर करारामध्ये रू. ५७००/- ची भरघोस वाढ झाली. बेसीकमध्ये ५०% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये ५०% आणि कालावधी ३ वर्षाकरीता करण्यात आला. ओटी, महागाई भत्ता, बोनस, रेनकोट, सेफ्टी शुज, ईतर सुविधा तसेच सरकारी नियमा नुसार सर्व फायदे देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) च्या नेतृत्वामुळे कामगारांना विविध सेवा सवलती चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असल्यामुळे कामगार वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कामगारांनी कंपनी प्रशासन तसेच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS)च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.