pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

देहेडकरवाडी ते लक्कडकोटला जोडणारा पुल बंद करुन जतन करण्याची मागणी

0 3 0 4 8 9
जालना/प्रतिनीधी,दि.24
देहेडकरवाडी ते लक्कडकोटला जोडणारा पुल वाहतुकीस बंद करण्यात यावा तसेच सदर पुल जागीतक वारसा घोषीत करून त्याच्या देखभालीकरीता कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी महा लोकाधिकार सेनेच्या वतीने एका निवेदनाव्दारे जालना महानगर पालीकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी.जे., महासचीव शेख मतीन, संपादक विकासकुमार बागडी, जिल्हा उपाध्यक्ष बशीर खान, शेख मोहसीन लकी, नवीद काजी आदिंची उपस्थिती होती.
पुढे निवेदनात असे म्हटले आहे की,  जालना शहरातील देहेकडवाडी ते लक्कडकोटला जोडणारा एक पुरातन व ऐतीहासीक पुल आहे. सदर पुलावरुन अनेक शतके दळणवळण होत आहे. परंतु पुल ऐतीहासीक असल्यामुळे त्याला दुरुस्त करणे किंवा त्याठिकाणी नवीन पुल बांधणे अशक्य आहे. अनेक तपानंतर लक्कडकोट ते सदर पुलापर्यंत अत्यंत अत्याधुनीक असा सिंमेट रोड तयार करण्यात आला आहे, परंतु पुलापासुन ते विठ्ठलाशाळेपर्यंतचा रस्ता तसाच सोडण्यात आलेला आहे, आता सदर रस्ता दुरुस्तीकरीता किंवा नवीन होण्याकरीता किती दशके वाट पहावी लागेल हे सांगणे अशक्य आहे. नवीन रोड तयार झाल्यामुळे एका साईडने वाहनांची वाहतुक वाढलेली आहे तसेच एका साईटला नवीन रस्ता व दुसर्‍या साईडला जुना रस्ता असल्यामुळे त्याचा समतोल बिघडला आहे तसचे त्यावर अनेक छोटेमोठे खड्डे पडल्यामुळे तो कमकुवत झाला आहे, अशा परिस्थतीत पुल केव्हाही पडण्याचा धोका संभवतो. असा ऐतीहासीक पुल व रस्ता जालना जिल्ह्यामध्ये दुसरा नाही, यामुळे तो पडणे आपल्याला शोभणार नाही.
याकरीता हा ऐतीहासीक पुल आहे त्या स्थितीत जतन करण्याकरीता सदर पुल वाहतुकीस त्वरीत बंद करण्यात यावा व सदर पुलाला जागतीक वारस्याचा दर्जा देवुन त्याच्या देखभालीकरीता कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरुन कोणत्याही परिस्थीत पुलाला नुकसान पोहोचणार नाही.
वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मंजुर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. मागण्या मंजुर न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्त महानगर पालीका जालना यांची राहील असे नमुद करण्यात आले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 0 4 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे