pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयडी क्रमांकासाठी शेतकऱ्यांनी ‘ग्रीस्टॅक’ मोबाईल ॲपवर नोंदणी करा, जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

0 3 2 1 6 3

जालना/प्रतिनिधी,दि.4

राज्यात. 1 डिसेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार माहिती संच तयार करणे आणि शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देणे हे काम मोहीम म्हणून राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्लेस्टोअरवरून ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ मोबाईल ॲपवर आधार क्रमांक नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे नाव, जमिनीची माहिती आणि आधार क्रमांक जोडला जाईल. यावरून शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या जमिनीचे नेमके क्षेत्रफळ कळेल. त्याशिवाय, भूमी अभिलेखागार विभागाने केंद्र सरकारला अधिकाऱ्यांना आधार जोडण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारने त्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकार राईट्स ऑफ रेकॉर्डमध्ये शेतकरी जमीन मालक असल्याची ओळख पटवून देणार आहे. त्यासाठी तलाठ्यासमोर जमिनीची नोंद केली जाणार आहे. जमिनीचा मालक तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी करेल. नाव आणि त्यांचा कृषी डेटाबेस 64 शेतकरी वापरतील. शेतकऱ्यांची ओळख पटवणारा आधार क्रमांक त्याच्या स्वत:च्या शेतीशी जोडला जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यासोबत शेतकरी ओळख क्रमांक दिला जाईल.जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात संमतीशिवाय संबंधित शेतकऱ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक गैरव्यवहार होत होते. मात्र, आता शेतकऱ्यांना अशा व्यवहारांची माहिती मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभाग एसएमएसद्वारे ओटीपी देणार आहे. हा ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल. शेतकऱ्यांच्या ओळखपत्रासह हक्काचे रेकॉर्ड जोडण्याचे काम तलाठी करणार आहेत. या योजनेचा फायदा होणार आहे. एग्रीस्टॅक प्रकल्प येत्या तीन महिन्यांत प्रकल्प पूर्ण होईल.अशी माहिती ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी समितीचे सचिव आणि निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनीही माहिती दिली आहे.

रा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे