अधिकार्यांचा अलीबाग वसई काॅरेडोर बाधीत शेतकर्यांना चूना लावण्याचा प्रयत्न.
काॅरिडोर साठी अधिकार्यांचाच अडथळा; महत्वाच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा प्रयत्न; शेतकरी देणार न्यायालयात आव्हान.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
अलिबाग विरार काॅरिडोर बाधीत शेतकर्यांची सभा संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण मंदिर टाकीगाव च्या भव्य प्रांगणात झाली.यावेळी भूसंपादन अधिकार्यांनी या अतीमहत्वाच्या आणी किमती जमीनींना दिलेला अत्यंत कमी भाव आणी शेतकर्यांच्या फसवणूकीचा निषेध केला.तसेच न्याय मिळण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर येत्या २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी या सभेत शासनाच्या फसव्या धोरणाविरूद्ध लढण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला आहे.
वसई विरार काॅरिडोर बाधीत शेतकर्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवीली होती.त्यावेळी त्यांनी उरण मधील जमिनींचा वाढता भाव पाहून भाव देण्याची मागणी केली होती,तसेच पुनर्वसन व शासनाच्या ईतर सोई सवलतींची लेखी मागणी केली होती.त्या संदर्भात त्यांनी प्रांत दत्रात्रेय नवले यांच्या सौबत आठ वेळा बैठका घेतल्या व सदनशिर मार्गाने आपले म्हणने मांडले.परंतू शेतकर्यांच्या कोणत्याही मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत .त्यामूळे शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जेएनपिटी ,ओएनजीसी,बिपीसील सारखे प्रकल्प उरण मध्ये आहेत.तर तिसरी मुंबई देखील येथेच बसणार आहे.हाकेच्या अंतरावर विमानतळ होत आहे.तर अटळसेतू मूळे मुंबई विस मिनटाच्या अंतरावर आली आहे.येवढी महत्वाची आसलेली उरण करांची जमिन घेताना ,तिचा मोबदला ठरवताना शासनाने केवळ शेतकर्यांना फसविण्याचा धोरण अवलंबीला आहे.त्यामूळे शेतकर्यांमध्ये प्रचंड मनस्ताप असून आता शासनाला कवडीमोल किमतीत जमिनी देणारच नाही असा निर्धार करत,सन्माननीय उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी प्रचंड संख्येने शेतकरी उपस्थीत होते व हजारोंच्या संख्येने २२ फेब्रुवारीला जिल्हाधीकारी कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे.तर व्यासपिठावर संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर,
संघटनचे खजिनदार महेश नाईक,सचिव रविंद्र कासूकर, उरण सामाजीक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,वसंत मोहीते, संतोष पवार,रमण कासकर, उपाध्यक्ष राजाराम जोशी, उपाध्यक्ष रमण कासकर,उपाध्यक्ष नामदेव मढवी,चिरनेर अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष कडू, सदस्य सिकंदर जोशी,विजय म्हात्रे विवीध मान्यवर व हजारो शेतकरी उपस्थित होते