जालना जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री. तरुण पिढी मध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण अधिक. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज- जितेंद्र गाडेकर यांचे आवाहन.
गुटखा वैध की अवैध, सर्वसामान्यांना पडला प्रश्न

जालना/प्रतिनिधी, दि.10
जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधीत गुटख्याची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अवैध गुटख्याची राजरोस होणारी विक्री पाहून सर्वसामान्य नागरिकांना गुटखा वैध की अवैध, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. जालना तालुक्यासह जिल्हयात गुटख्याचे पेव फुटले आहे. जिल्हयातील शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रेते दुचाकी वाहनांवर सकाळी ग्रामीण भागात तसेच शहरातील विविध दुकांनावर गुटखा विक्रीसाठी नेताना दिसत आहेत. अवैध गुटख्यातून होणारी मोठी कमाई लक्षात घेउन बहुसंख्य किराणा दुकानदार व पानपट्टी चालक गुटखा विक्री करीत आहेत.
जालना शहरात मध्यंतरी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर गुटख्याच्या विक्रीला काहीसा लगाम बसेल अस असताना मात्र, त्यानंतर पुन्हा चोरी छुपे गुटखा विक्री सुरू झाली आहे. महिला व अल्पवयीन मुलांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या अल्पवयीन मुलांना व्यसनाधिनतेच्या खाईत लोटण्याचे काम गुटखामाफिया करत आहते. अन्न व औषध प्रशासनाकडून माफियाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाने माफियांविरोधात कठोर पाऊले उचलून कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.
गुटखा विक्रीसाठी विविध क्लुप्त्या
गुटखा विक्रेते वाहनातून गुटखा विक्री करण्यासाठी नेतांना तो इतर सामानाखाली झाकून नेण्यात येतो. अनेकदा उदबत्तीसह इतर वस्तुसोबत गुटखा विक्री केली जाते. जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांची संख्या मोठी असून, सकाळी हे विक्रेते किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना दुकानापर्यंत ‘सर्व्हिस’ देत आहेत.