pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.2

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोफत 45 दिवसीय तांत्रिक निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मुख्य कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
तांत्रिक अभ्यासक्रम ३D प्रिंटगसाठी OCAD फाईलची तयारी उलट अभियांत्रिकी अनुप्रयोगांसाठी ३D स्कॅनिंग कार्यप्रवाह सर्व प्रमुख ३D प्रिटिंगवर व्यावहारिक प्रशिक्षण तंत्रज्ञान (FDM, SLS आणि DLP) सर्वात प्रगत आणि व्यावहारिक प्रशिक्षण अद्वितीय संमिश्र ३D प्रिंटर, इत्यादी उद्योजकीय अभ्यासक्रमात उद्योजकीय प्रेरणा, उद्योजकीय गुणसंपदा, विविध संधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, उद्योगाचे निवड उद्योगाचे व्यवस्थापन, उद्योगाला आवश्यक विविध परवाने, शासकीय व निमशासकीय विविध कर्ज योजना, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे बँकेची कर्ज प्रक्रिया, इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच प्रशिक्षण पश्चात उद्योग सुरू करण्यासाठी हॅन्ड होल्डिंग सपोर्ट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत केला जाईल.
सदरील प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीकडे जातीचे प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्डची छायांकित प्रत असणे गरजेचे असून उमेदवार हा १८ ते ५० या वयोगटातील असणे आवश्यक आहे. सदर निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमांचे सविस्तर माहिती मिळण्याच्या दृष्टीने दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२४ बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, जालना येथे मोफत उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले इच्छुकांनी सदर कार्यशाळेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती करूणा खरात महाव्यवस्थापक, जिऊके, जालना वडी.यु.थावरे विभागीय अधिकारी, एमसीईडी, छ. संभाजीनगर यांनी केले आहे. संपर्क- प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना फोन ०२४८२-२२०५९२ मो.८०८७२८३०६५, ७३५०४१८४९२ असा आहे. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे