चाचा नेहरु बाल महोत्सव उत्साहात साजरा

जालना/प्रतिनिधी,दि.09
जिल्हास्तरीय तीन दिवसीय चाचा नेहरु बालमहोत्सव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना यांच्यामार्फत दि.6 ते दि.8 जानेवारी 2025 या कालावधीत पोलीस मैदान, जालना येथे उत्साहात पार पडला.
बाल महोत्सवादरम्यान दि.6 जानेवारी रोजी मैदानी खेळ घेण्यात आले यात गोळा फेक, थाळी फेक, 100 मीटर धावणे, लिंबु चमचा, पोत्याची रेस, कबड्डी, लांब उडी स्पर्धा घेण्यात आली. दि.7 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा घेण्यात आली. तर दि. 8 जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येवून विजेत्या बालकांना बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती.कोमल कोरे, बाल न्याय मंडळ सदस्य, निरीक्षणगृह व बालगृहांचे अधिक्षक, शासकीय मुलींच्या निवासी शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.