pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संविधान दिनानिमित्त समाज कल्याणच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. कार्यक्रम

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि. 25

 संविधान दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे  दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता भारसाकडे  हे उपस्थित राहणार आहेत.  कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. बी. वाय. कुलकर्णी हे असणार आहेत. ते भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे