pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोतवाल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी अंबड तहसील कार्यालयातून हस्तगत करावेत

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि.28 

कोतवाल पदासाठी आवेदन पत्र भरुन परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व परीक्षार्थींची कोतवाल निवड समिती तालुका अंबड मार्फत रिक्त असलेल्या दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परिक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. तरी आता कोतवाल परीक्षा शनिवार दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जालना येथील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोतवाल भरती परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे वितरण तहसील कार्यालय, अंबड येथून करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून या कक्षामधून दि. 29 सप्टेंबरपासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तरी कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय अंबड येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेताना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन अनुज्ञप्ती, पासपोर्ट ओळखपत्र, मतदार ओळखपत्र यापैकी कोणत्याही ओळखत्राची मुळ प्रत सोबत आणावी. असे तहसीलदार तथा तालुका निवड समिती, अंबड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2