pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आरण तीर्थक्षेत्रास अ दर्जा मिळवण्यासाठी सावता महासंघ आयोजित मोहीम मुख्यमंत्र्यांना दहा हजार सह्यांचे निवेदन देण्याच्या मोहीमेची सिंधी काळेगाव येथून सुरूवात

0 1 1 8 2 2

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी,दि.16

सावता महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे अरण तीर्थक्षेत्रास अ दर्जा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दहा हजार सह्यांचे निवेदन मोहीम आज संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सिंधी काळेगाव येथे सावता महाराजांचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून सुरु करण्यात आली .
यावेळी सिंधी काळेगाव येथील गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी सावता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस शिवसेना तालुका उपप्रमुख सखारामजी गिराम, सिंधी काळेगाव येथील सरपंच सुभाष गिराम, ग्रामपंचायत सदस्य भागवत गिराम,जनार्दन गिराम ,यांच्यासह शिक्षक बंडू गिराम ,जनार्धन गिराम ,विष्णू गिराम ,शिवाजी गिराम ,एकता परिषद जिल्हा संघटक राम गिराम ,शिवाजी गिराम ,गजानन गिराम ,अशोक मगर ,सुनील खेत्रे ,रामेश्वर कातकडे ,गणेश गिराम ,व गणेश गिराम , मिठाराम गिराम, गणेश गिराम, रमेश गिराम,रमेश गिराम, नामदेव मगर ,विश्वनाथ गिराम, रामेश्वर गिराम, दत्ता मगर यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदरील प्रसंगी सावता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस यांनी आरण तीर्थक्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांना दहा हजार सह्याचे निवेदन देण्याच्या मोहिमेची पार्श्वभूमी समजून सांगितली. तदनंतर मान्यवर सखाराम गिराम, विष्णू गिराम यांची मनोगत झाली व आभार प्रदर्शन श्री गणेश गिराम यांनी केले व उपस्थितांच्या निवेदनावर सह्या घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2