pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा युवक व क्रीडा विभाग अध्यक्षपदी आदित्य घरत

0 1 1 8 3 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

रायगड जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची बैठक अलिबाग येथील बॅ. अंतुले भवन ( काँग्रेस भवन )येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याच्या प्रभारी चारूलता टोकस मॅडम, सहप्रभारी राणी अग्रवाल मॅडम, सहप्रभारी श्रीरंग बरगे,समिता गोरे- अध्यक्ष क्रिडा व युवक सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.रायगड जिल्ह्याच्या युवक व क्रीडा विभाग रायगड जिल्हा अध्यक्षपदी आदित्य घरत यांची निवड यावेळी जिल्ह्यातील सर्व सेल चे अध्यक्ष, जिल्हा प्रीतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत यावेळी युवक व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा अध्यक्षपदी आदित्य घरत यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले.युवक व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रायगड जिल्हा अध्यक्षपदी आदित्य घरत यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.काँग्रेस पक्षाचे कट्टर व एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आदित्य घरत यांची ओळख असून त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. या निवडी बद्दल आदित्य घरत यांनी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह सर्वच काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार करेन, पक्षाचे काम एक निष्ठेने व प्रामाणिकपणे करेन अशी भावना आदित्य घरत यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4