फ्लाईंग बर्ड स्कुलचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन ‘प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न
पंढरीची वारी आणि 'दशावतार 'नाट्यप्रयोग सादरीकरणामुळे प्रेक्षक भारावले.

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.23
पुणेः- येथील फ्लाईंग बर्ड स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध नृत्य ,संगीत ,नाटिका आदी रंगारंग आकर्षक वेशभुषातील उत्कृष्ट सादरीकरणामुळे अनेक पालक प्रेक्षकांनी कौतुक करुन समाधान व्यक्त केले.तर विद्यार्थ्यांंनी आयोजित केलेल्या पंढरीच्या वारीत दिंडीचे आयोजन तसेच सांगता कार्यक्रम प्रसंगीचे प्रसिध्द “दशावतार “हे नाटक आकर्षण ठरले.त्यामुळे प्रचंड संख्येने आलेले पालक -प्रेक्षक अक्षरशः भारावले.
भारती विद्यापीठ परिसरातील नावाजलेल्या फ्लाईंग बर्ड स्कुलचे ‘वार्षिक स्नेहसंमेलन’ मनपाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमास प्रामुख्याने गिरीप्रेमी संस्थापक उमेश झिरपे,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले,अभिनेता ऋतुराज शिंदे,भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामटे,डाॕ.शैलेश त्रिभुवन,माजी नगरसेवक युवराज बेलदरे,अश्विनीताई भागवत,पल्लवीताई जगताप,दिपिकाताई बापट,दादा पारवडे,समीर धनकवडे,संतोषभाऊ फरांदे,मनोज लेले,दिवाकर पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांचे फ्लाईंग बर्ड स्कुलचे संस्थापक जयंत परांजपे ,सहसंस्थापिका सुजाता परांजपे ,प्रिन्सिपल कविता पाटील आदीनी स्वागत केले.तर याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेकांना सन्मानित करण्यात आले.प्रामुख्याने या कार्यक्रमात विशेषतः एसओएफ संस्थेकडुन आॕलिम्पियाड परिक्षा करिताचा “डिस्ट्रीक प्रिन्सिपल अवार्ड “2022-23 चा पुरस्कार फ्लाईंग बर्ड स्कुलच्या प्रिन्सिपल कविता पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
प्रारंभी आराध्य देवता गणपती,सरस्वती,नटराज,श्रीकृष्ण,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्ती,प्रतिमाचे पुजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या भव्य स्नेहसंमेलनात लहान विद्यार्थ्यांपासुन प्राथमिक ,माध्यमिक विद्यार्थ्यांंनी आयोजित सत्रात आपले कलागुण उत्कृष्टरित्या सादर केले.त्यामध्ये विविध नृत्य सादर करतांना आकर्षक रंगभुषा तर उत्कृष्ट अभिनय करत नाटिका सादर करण्यात आल्या.तसेच संगीत कार्यक्रमात तबला वादनातुन ‘गणेशवंदना’ सादर करण्यात आली.या आगळ्या कलागुणाने प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले.या स्नेहसंमेलनातील सर्व विद्यार्थी कलावंतानी पंढरीची वारीमध्ये “दिंडी”चे आयोजन विशेष आकर्षण ठरले.नामघोषाने तर अवघी पुण्यनगरी दुमदुमली असा भास याप्रसंगी होत होता.याच कार्यक्रमात इस्काॕन हरेकृष्ण मंदिरच्या भक्तांनी ‘हरेकृष्ण हरे राम’चे मनमोहक भजनही सादर केले.शेवटी या स्नेहसंमेलनाची सांगता ‘बाळकृष्ण गोरे पारंपारिक नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग निर्मित प्रसिध्द “दशावतार “या नाट्यप्रयोगाने झाली.हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी फ्लाईंग बर्ड स्कुलचे शिक्षकवृंद,सर्व सहकारी तसेच परांजपे कुटुंबीय यांनी परिश्रम घेतले.तर प्रसिध्दी सहकार्य आत्माराम ढेकळे यांनी केले.