टेंभापूरी येथे बालसंस्कार शिबिराचा समारोप

आनिल वाढोणकर/छ.संभाजीनगर,दि.4
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र बजाजनगर दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या वतीने येथे जि प प्राथमिक शाळा टेंभापुरी येथे बालसंस्कार युवा प्रबोधन आयोजित 15 एप्रिल ते 1मे 2024 पंधरा दिवसीय स्व संरक्षण डिफेन्स लाठी काठी, कराटे, भाला, प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.. शहरामध्ये मुलींसोबत वाईट घटना घडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.. प्रत्येक मुलींना व मुलांना सक्षम बनवणे ही काळाची गरज असुन संकट समयी स्वतः चे संरक्षण कसे करायचे हे तंत्र माहीत असल्यास ती स्वतः चे स्व संरक्षण नक्कीच करु शकते ह्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते… प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थ्यांना स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने ह भ प उल्हास महाराज सुर्यवंशी (अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था) आळंदी यांच्या शुभहस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले… वैष्णवी गायकवाड व श्रद्धा दिलीप ढोले यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी, शेतकरी कृती समिती चे अध्यक्ष राहुल ढोले, लोकनियुक्त सरपंच श्री धनंजय ढोले, उप सरपंच श्री संतोष खवले, शालेय कमिटी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर इंगळे व सर्व शिक्षक टीम, नी सहकार्य केले….