द्रोणागिरी सेक्टर ५१ देव कृपा चौकात हिट अँण्ड रन चा थरार.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25
उरण तालुक्यात सिडको च्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडचे झालेले विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या हातगाड्या, त्याचप्रमाणे भर रस्त्यावर भरणारा आठवडा बाजार हे सारे कुणाच्या परवानगी ने किंवा कुणाच्या मर्जीने चालत आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे.
परंतु सिडकोने द्रोणागिरी नोडचे विस्तारीकरण केले आहे रस्ते नाले बांधले आहेत, पण जीथे चार रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी अजूनही सिग्नल ची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे दिवसभर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. कुणीही दुचाकी चारचाकी चालक कुठूनही येत आहे. आणि अशावेळी तंद्रीत असणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता च्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बसस्टँड देवकृपा चौकात, उरण पनवेल रोडवर एकविरा पान पट्टी समोर उरण कडून येणाऱ्या हरियाणाची पासिंग असलेल्या भरधाव होंडा सिटीने ४ ते ५ जणांना उडवीत नेत तसेच समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या ७ ते ८ मोटार सायकल तसेच त्यातीलच एका स्कुटीवर उभ्या असलेल्या व्यक्तीस उडवून एका हातगाडीलाही उडविला आहे.हिट अँण्ड रन चा थरार येथील प्रवासी नागरिकांना व द्रोणागिरी रहिवासियांना अनुभवास मिळाला आहे.
एकंदरीत द्रोणागिरी नोड विकसित करण्यात आले आहे मात्र अजूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.