टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23
जाफ्राबाद दिनांक 18 सप्टेंबर 2025 येथील सिल्लोड शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष या विभागा तर्फे बजाज ऑटो लिमिटेड वाळूज, छ. संभाजीनगर व टाटा मोटर्स प्रा. लि. पुणे या कंपनीने कॅम्पस भरती आयोजित केलेली होती. या कॅम्पस भरतीमध्ये टाटा कंपनीकडून बारावी उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच बजाज ऑटो लिमिटेड वाळूज छ. संभाजीनगर या कंपनीने दोन विद्यार्थ्यांची निवड केली या निवडीबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के, सचिव प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर टी देशमुख उपप्राचार्य डॉ. एस एल मेढे उपप्राचार्य डॉ. एस के सर्जे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे, या विभागाचे समन्वयक प्रोफेसर डॉ. विजय पाटील डॉ.एस एस ठोंबरे, डॉ. एस डी एरंडे, डॉ प्रदीप मिसाळ, डॉ. डी टी तांगडे, डॉ.बी के आहेर प्रा. यु एम वझरकर व विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. अनिल वैद्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

