pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गेल इंडिया पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.29

रायगड जिल्ह्यातील उरण,पनवेल,पेण तालुक्यातील उरण ते उसर अलिबाग येथे गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे येथील शेतकरी हा अल्पभूधारक असून त्याच्या जगण्याचे एकमेव साधन शेती संपादित केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचा धडक मोर्चा अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. सदर मोर्चाला मोठ्या प्रमाणात विविध तालुक्यातील गावातील शेतकरी,महिला उपस्थित होत्या. मोर्चाची सुरवात कृषीवल कार्यालय अलिबाग पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने घोषणा देत झाली. जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने देत उपस्थित सर्वहरा राष्ट्रीय आंदोलन नेत्या उलका महाजन, इंटक सरचिटणीस महेंद्र घरत, महिला किसान अधिकारी मंच वैशाली पाटील, सीआयटीयू चे महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी भूषण पाटील,अखिल भारतीय किसान सभा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे,अखिल भारतीय किसान सभा राज्य कोषाध्यक्ष संजय ठाकूर अशा विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांना गेल इंडिया पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन स्विकारायला नायब तहसीलदार गोतारणे, निवासी उपजिल्हाधिकारी शिर्के यांना शिष्ट मंडळ भेटले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे