pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत कोणतेही कायदेशीर अधिकार, हक्क नसताना गाव पंच व ग्रामस्थांची हुकूमशाही.

आपल्याला न्याय मिळावा अशी संदिप ठाकूर यांची प्रशासनाकडे मागणी.

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

संदिप शंकर ठाकूर, रा. नेरे- टेमघर, ता. पनवेल, जि. रायगड यांचे मौजे नेरे–टेमघर हद्दीत ताबे कब्जा, वहिवाटींत व कसवणूकीत असलेला सर्व्हे क्रमांक १४६ / १ चे तथाकथीत स्वयंघोषीत गावकी पंच गजानन हरी पाटील, किशोर बारकू खारके, जयदास अनंत पाटील, सचिन अनंत पाटील, दिनेश काशिनाथ मांडवकर, अनिल गजानज रांजणे, सुभाष झुगा पाटील, हृतिक एकनाथ पाटील, हरिश्चंद्र गोविंद पाटील व इतर ४०० ते ५०० चे जमावांनी बेकायदेशीरपणे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न अवलंबीता घुसून तेथील पक्क्या स्वरूपांतील असलेले कुक्कुटपालन करीता केलेले पत्रा शेड जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने तोडल्याबाबत, तसेच आंबा, काजू, पेरू, चिकु, शेवगा व इतर भाजीपाला चे प्रचंड नुकसान केलेबाबत, तथा सदर जागेत प्रचंड प्रमाणांत नासधूस केलेबाबत, तसेच त्याठिकाणी असलेले घराची तोडफोड व त्यातील संसार उपयोगी सामानाची नासधूस केलेबाबत, तसेच सदर मिळकतीचे संरक्षक कुंपनाची तोडफोड करून ताबा घेणेचा प्रयत्न केलेबाबत सदर गावचे पंच व जमलेल्या जमावावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे संदिप ठाकूर यांनी मानवी हक्क आयोग मुंबई, राज्य मागास आयोग मुंबई, पालकमंत्री महाराष्ट्र, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आदी ठिकाणी केली आहे.

मौजे नेरे- टेमघर, ता. पनवेल, जि- रायगड येथे सर्व्हे क्रमांक १४६ /१ ही मिळकत सलग १६ वर्षे पेक्षा अधिक काळ सातत्याने समस्त गावकीचे माहितीत व विना तक्रार संदिप ठाकूर यांच्या ताबे कब्जा, वहिवाटीत व कसवणूकीत आहे. सदर जागेवर संदिप ठाकूर हे उदरनिर्वाहाकरीता, कुक्कुटपालन व शेळीपालन चा व्यवसाय करीत आहेत . तसेच सदर मिळकतीवर आंबा, काजू, पेरू, चिकू, शेवगा व इतर भाजीपाला यांची लागवड देखील ते वर्षानुवर्षे करीत आहेत.तसेच सदर मिळकतीवर निवारा म्हणून त्यांनी घर देखील बांधलेले होते व आहे.

 

मौजे नेरे- टेमघर, ता. पनवेल येथील संदिप ठाकूर यांचे ताबें कब्जांत, वहिवाटीत कसवणुकीत सर्व्हे क्रमांक १४६ / १ ही मिळकत आहे. तथापी मौजे नेरे टेमघर येथील तथाकथीत गावकरी पंच नेरे यांचेकडून सर्व्हे क्रमांक १६१ (जुना सर्व्हे क्रमांक ३१४) मध्ये असलेल्या बांधकामाबाबत साधारणतः २० दिवसापुर्वी तारीख नमूद नसलेली बेकायदेशीर नोटीस पाठविली होती. सदर नोटीसीत सर्व्हे क्रमांक १६१ (जुना सर्व्हे क्रमांक ३१४) मध्ये असलेल्या बांधकाम पाडण्याबाबत सुचना दिली होती.सूचनेतील विषयांत नमूद गावकरी पंच नेरे व इतर इसम मौजे नेरे- टेमघर, ता. पनवेल, जि. रायगड येथील संदीप ठाकूर यांचे तावे कब्जा, वहिवाटीत व कसवणूकीतील सर्व्हे क्रमांक १४६ / १ ही मिळकतींत दिनांक १४/०६/२०२३ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता बेकायदेशीरपणे घुसुन कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न अवलंबीता, ग्रामपंचायत, सिडको (नैना), तथा कोणत्याही नियोजन प्राधिकरण यांचे आदेश नसतांना कुक्कुटपालन करीता केलेले पत्रा शेड तोडल्याबाबत, तसेच आंबा, काजू, पेरू, चिकू, शेवगा व इतर भाजीपाला चे प्रचंड नुकसान केलेबाबत, तथा सदर जागेत प्रचंड प्रमाणांत नासधूस केलेबाबत, तसेच त्याठिकाणी असलेले घराची तोडफोड व त्यातील संसार उपयोगी सामानाची नासधूस केलेबाबत, तसेच सदर मिळकतीचा ताबा घेणेचा प्रयत्न केला आहे.

रायगड जिल्हयात अशा तथाकथीत जात पंचायतीच्या स्वयंघोषात पंचाचा कायम धुडगुस चालू आहे. अशा प्रकारे तथाकथीत स्वयंघोषीत पंच हे पोलीस स्टेशन व महसुल प्रशासनाचे अधिकार स्वत:च वापरून हिंसक मार्गान करीत आहेत. अशा प्रकारचे तथाकथीत स्वयंघोषीत गावकी पंच हे संदीप ठाकूर यांच्या सारखे लोकांना जाणीवपुर्वक त्रास देण्याकरीता असे बेकायदेशीर कृत्य करीत आहेत. अशा प्रकारची तथाकथीत स्वयंघोषीत गावकी पंच प्रचलीत कायदयांस बगल देवून, तथा कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता संदिप ठाकूर सारख्या शेतकऱ्यांचे खच्चीकरण करणेकरीता अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करीत आहेत. सदर बाब लोकशाहींस धरून नाही.

सबब मौजे नेरे- टेमघर, ता. पनवेल येथील संदिप ठाकूर यांचे तावे कब्जांत, वहिवाटीत, कसवणुकीत सर्व्हे क्रमांक १४६ / १ ही मिळकतीत वर विषयांत नमूद केल्याप्रमाणे तथाकथीत गावकी पंच गजानन हरी पाटील, किशोर बारकू खारके, जयदास अनंत पाटील, सचिन अनंत पाटील, दिनेश काशिनाथ मांडवकर, अनिल गजानज रांजणे, सुभाष झुगा पाटील, हृतिक एकनाथ पाटील, हरिश्चंद्र गोविंद पाटील व इतर ४०० ते ५०० चे जमावाने घुसून तेथील पक्क्या स्वरूपांतील असलेले कुक्कुटपालन करीता केलेले पत्रा शेड तोडल्याबाबत, तसेच आंबा, काजू, पेरू, चिकू, शेवगा व इतर भाजीपाला चे प्रचंड नुकसान केलेबाबत, तथा सदर जागेत प्रचंड प्रमाणांत नासधूस केलेबाबत, तसेच त्याठिकाणी असलेले घराची तोडफोड व त्यातील संसार उपयोगी सामानाची नासधूस केलेबाबत, तसेच सदर मिळकतीचे संरक्षक कुंपणाची तोडफोड करून ताबा घेण्याचा प्रयत्न केलेबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पीडित शेतकरी संदिप ठाकूर यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.कोणतेही बांधकाम मग ते अधिकृत असो वा अनधिकृत ते बांधकाम तोडण्याचा गाव पंच व ग्रामस्थांना कोणताही हक्क अधिकार नाही. तो अधिकार जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आहे. मात्र पंच व ग्रामस्थांनी बांधकाम तोडण्याची केलेली कृती बेकायदेशीर व नियमबाह्य आहे असे शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

—––——————————————————

संदीप ठाकूर यांनी स्वतःची जागा सोडून इतर ठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यांनी गावाच्या जागेत अतिक्रमण केले आहे. स्वतःची जागा सोडून इतर जागा त्यांच्या नावावर असल्याचे कागदपत्रे त्यांनी दाखवावीत. अनधिकृत जागेत केलेले बांधकाम त्यांनी स्वतः तोडावे यासाठी त्यांना नोटीस दिली होती. त्यांना समज सुद्धा दिली होती पण त्या नोटीसीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ग्रामपंचायतची कायदेशीर परवानगी घेऊनच सदर पंचानी अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. यात आम्ही कोणतेही बेकायदेशीर किंवा चुकीचे काम केलेले नाही. गावच्या कल्याणासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. वयक्तिक द्वेषापोटी आम्ही कोणावरही कारवाई केलेली नाही. सामंजस्याची भूमिका घेतल्यास हे प्रकरण मिटविता येऊ शकतो मात्र संदीप ठाकूर हे सामंजस्याची भूमिका घेत नाहीत.
– वामन पाटील, पंच.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे