वेध उपक्रमांतर्गत भानेगाव जिल्हा परिषद शाळेची पडताळणी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक सिईओ मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागा अंतर्गत डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक यांचे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तथा वेध प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .
यामध्ये हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव येथील उपक्रमशिल शिक्षक एस एन मोरे यांच्या शाळेची व वर्गाची केंद्रप्रमुख जी.पी.पुलकंठवार यांनी सर्व मुद्यांची पडताळणी करून विद्यार्थांचे वाचन,श्रृतलेखन, प्रशिक्षण वेळी लिंक मध्ये भरलेल्या विविध मुद्द्यांवर आधारित खातरजमा केली.
शालेय परिसर, शालेय रंगमंच (स्टेज ) रंगरंगोटी, शाळेच्या भिंती कार्यालय व एकंदरीत परिसर पाहून समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी भानेगाव शाळेचे मुख्याध्यापक एस.एन.मोरे व सोळंके सर आदी उपस्थित होते.सदर उपक्रमांतर्गत हदगाव तालुक्यातील भानेगाव,पिंपरखेड , केदारगुडा ,गारगोटी , पळसा ,गोजेगाव आदी शाळांनी आपापला सहभाग नोंदवला आहे.
सदर उपक्रमांतर्गत 30 उत्कृष्ट शिक्षक निवड करून त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे.