जगजीवन भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त राबविण्यात आले विविध सामाजिक उपक्रम

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
शिवसेनेचे निष्ठावंत, एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे द्रोणागिरी शाखेचे शाखा प्रमुख जगजीवन भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त उरण मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. द्रोणागिरी शिवसेना शाखा येथे आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आले. डॉ सेजल घरत, डॉ रश्मी गुप्ता यांच्या माध्यमातून मानदुखी, कंबर दुखी, हातपाय दुखणे, पाठ दुखी, सांधे दुखी आदी मानवी शरीराच्या दुखण्या वर मोफत सल्ला व मोफत औषधे देण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता उरण चारफाटा येथे सुफल आहाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील गोर गरिबांना अन्नदान करण्यात आले.We club Dronagiri तर्फेही विविध कार्यक्रम अयोजित केले होते.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, द्रोणागिरी शिवसेना शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत जगजीवन भोईर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.